( किटी ओ मियरा यांच्या अॅंड पीपल स्टेड होम' या कवितेचा स्वैर अनुवाद)
आणि लोक घरी राहिले
आणि त्यांनी पुस्तकं वाचली व 'ऐकलं'
आणि ते विसावले व व्यायाम केला
आणि त्यांनी कला जोपासली व खेळ खेळले
आणि त्यांनी शोधून काढले 'असण्याचे' नवे मार्ग
आणि ते स्तब्ध झाले
आणि त्यांनी ऐकला खोलवर असणारा आतला आवाज
कोणी ध्यान केले
कोणी प्रार्थना
कोणी नृत्य
कोणी भेटले आपल्याच सावलीला
आणि लोक करू लागले विचार जरा वेगळ्या प्रकारे
आणि लोक बरे झाले
आणि निर्माण झाला अशांचा अभाव, जे होते बेदरकार, घातक, अविचारी व निर्दयी
त्या अभावामुळे सुधारू लागली प्रकृती अख्या जगाचीही
आणि जेव्हा संकट टाळलं
आणि 'माणसं' पुन्हा एकत्र आली
जे गेले आणि जे गमावले त्यासाठी शोकाकुल झाली
आणि त्यांनी निवडले नवे पर्याय
आणि पाहिली नवी स्वप्ने
आणि निर्मिले आयुष्याचे नवे मार्ग
आणि जशी त्यांनी दिली होती स्वतःला,
तशीच,
त्यांनी पृथ्वीला दिली नव संजीवनी
अनुवाद : दीप्ती नेने दांडेकर
२५/०३/२०२०
छान भावानुवाद!!
उत्तर द्याहटवाआपणही शोधून काढू 'असण्याचे'नवे मार्ग!!
आशावाद!
उत्तर द्याहटवा