रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

बाहुली


( फेसबुक वर एक इंग्रजी कथा वाचायला मिळाली आणि खूप भावली! तिचा हा अनुवाद. )

वयाची चाळीशी गाठलेला फ्रांझ काफ्का (१८८३-१९२४) अविवाहित आणि एकटा होता. एके दिवशी बर्लिन मधल्या एक उद्यानात फिरताना त्याला एक रडणारी चिमुरडी दिसली. तिची खूप लाडकी बाहुली हरवली म्हणून ती मुसमुसत होती. मग दोघांनी मिळून ती बाहुली शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या हाताला काही यश आलं नाही..

मग काफ्का त्या मुलीला म्हणाला, "उद्या मला परत भेट हं बाळा, आपण पुन्हा तुझ्या बाहुलीला शोधायचा प्रयत्न करू". दुसऱ्या दिवशी शोध सुरू करण्यापूर्वी काफ्काने त्या मुलीला बाहुलीने 'लिहिलेलं' एक पत्र दिलं! पत्रात लिहिलं होतं, "रडू नकोस गं, मला ना हे सगळं जग पहायचंय. म्हणून मी सहलीला निघालेय! मी तुला माझ्या प्रवासातल्या सगळ्या गोष्टी पत्रातून सांगत जाईन."


आणि इथून एक अशा कथेला सुरुवात झाली जी चालू राहीली काफ्काच्या अखेरच्या श्वासापर्यंत!


पुढच्या भेटीगाठींत काफ्का त्या मुलीला बाहुलीच्या पत्रातल्या गमतीजमती, थरारक अनुभव, किस्से वाचून दाखवू लागला. ते ऐकताना ती चिमुरडी हरखून, रमून गेली. 

अखेर एके दिवशी काफ्काने 'प्रवासाहून बर्लिनला परतलेल्या बाहुलीला' ( जी अर्थातच त्याने विकत घेतली होती) परत आणलं. 

"ही माझ्या बाहुलीसारखी अजिबात दिसत नाही", मुलगी हिरमुसून म्हणाली. तेव्हा काफ्काने बाहुलीचं आणखी एक पत्र तिला दिलं ज्यात लिहिलं होतं, "माझ्या प्रवासांनी मला संपूर्ण बदलून टाकलंय!" 

तेव्हा त्या मुलीने त्या नव्या बाहुलीला घट्ट मिठी मारली आणि अतिशय आनंदाने तिला घरी घेऊन गेली! 


वर्षभराने काफ्काचं निधन झालं. 

खूप वर्षं सरली. एक दिवस अचानक त्या मुलीला - जी आता एक तरुणी झाली होती - त्या बाहुलीच्या आत एक पत्र सापडलं! काफ्काची स्वाक्षरी असलेल्या त्या छोट्याश्या पत्रात लिहिलं होतं:

"तुम्हाला प्रिय असणारी प्रत्येक गोष्ट कदाचित हरवून जाईलही 

पण 

सरतेशेवटी प्रेम मात्र परतून येईल...

कुठल्यातरी दुसऱ्या रुपात.....!"


❤️

१२.०२.२३

स्वैर अनुवाद: 

वैद्य दीप्ती नेने दांडेकर

#दी_ने_दां 


पल

 घनी रात है ये जहां

ना चॉंद साथ है, वहां

सितारे समेट लो 


ना माझी देखो मुडमुडके

खोल ऑंखे बस आजके 

नजारे समेट लो


गमों का दर्या है जहाँ

मिले खुशी के पल यहाँ

ये सारे समेट लो..

ये सारे समेट लो...

दी_नें_दां

दीप्ती नेने दांडेकर

२५.०२.२३

मंगळवार, २४ मार्च, २०२०

आणि लोक घरी राहिले


( किटी ओ मियरा यांच्या अॅंड पीपल स्टेड होम' या कवितेचा स्वैर अनुवाद)

आणि लोक घरी राहिले

आणि त्यांनी पुस्तकं वाचली व 'ऐकलं'
आणि ते विसावले व व्यायाम केला
आणि त्यांनी कला जोपासली व खेळ खेळले
आणि त्यांनी शोधून काढले 'असण्याचे' नवे मार्ग
आणि ते स्तब्ध झाले
आणि त्यांनी ऐकला खोलवर असणारा आतला आवाज
कोणी ध्यान केले
कोणी प्रार्थना
कोणी नृत्य
कोणी भेटले आपल्याच सावलीला
आणि लोक करू लागले विचार जरा वेगळ्या प्रकारे
आणि लोक बरे झाले
आणि निर्माण झाला अशांचा अभाव, जे होते बेदरकार, घातक, अविचारी व निर्दयी
त्या अभावामुळे सुधारू लागली प्रकृती अख्या जगाचीही
आणि जेव्हा संकट टाळलं
आणि 'माणसं' पुन्हा एकत्र आली
जे गेले आणि जे गमावले त्यासाठी शोकाकुल झाली

आणि त्यांनी निवडले नवे पर्याय
आणि पाहिली नवी स्वप्ने
आणि निर्मिले आयुष्याचे नवे मार्ग
आणि जशी त्यांनी दिली होती स्वतःला,
तशीच,
त्यांनी पृथ्वीला दिली नव संजीवनी

अनुवाद : दीप्ती नेने दांडेकर
२५/०३/२०२०

शनिवार, २४ जून, २०१७

बारीश

मुशायरेमें हो रही थी अल्फाजोंकी बारीश,
कईयोंने ईर्शाद फरमाये ..
मैंने छुपाके रख दिये बादल तेरी याद के,
कहीं सैलाब न आजाये... 

शनिवार, १७ जून, २०१७

जेजे उत्तम तेच पहा अन् बोला ऐका करा 
आयुष्याचा मार्ग दाविला सचोटीचा अन् पूर्ण खरा
 मुली म्हणून कधी आम्हाला कोंडून ठेवलं नाहीत घरी
 म्हणालात बाळा भरपूर शिक स्वबळावर घे भरारी
 कला श्रमांचे नेहमीच कौतुक कुणीही असो आपले परके 
धडपडणा-या प्रत्येकाला म्हणूनच वाटता तुम्ही सख्खे
 कित्येक व्यक्तींची काढलेली जणू सजीव, चित्र सुरेख 
सुवाच्य नेटकं प्रामाणिक काम हीच तुमच्या यशाची मेख 
माणस जोडण्याचा छंद तुमचा जीवापाड जपली नाती
 प्रत्येक ठिकाणी तुम्ही उघडली कैक मैत्रीची खाती
 तुम्ही म्हणजे खरं सांगू बाबा? गोड सुरांंचा खळाळता झरा
 निर्मळ मन तीक्ष्ण बुद्धी कलापैलुंनी सजलेला हिरा